भयंकर ! तब्बल 42 दिवस मिठ्ठाच्या खड्ड्यात ठेवला होता मुलीचा मृतदेह…

https://youtu.be/uaLplyyOCcM

बातमी कट्टा:- मुलीचा बलात्कार करुन खून झाला असतांना पोलीसांनी खूनाचा गुन्हा दाखल करुन न घेता फक्त आत्महत्येचा गुन्हा नोंदवला तर शवविच्छेदन अहवालात तिच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत काहीही तपासणी करण्यात आली नसल्याने हतबल झालेल्या त्या पिडीत मुलीच्या वडीलाने न्याय मिळावा यासाठी मुलीचा अंत्यसंस्कार न करता तब्बल 42 दिवस तिचा मृतदेह मीठाच्या खड्ड्यात पुरुण ठेवल्याचे उघड झाले आहे.

https://youtu.be/uaLplyyOCcM व्हिडीओ बघण्यासाठी लिंकवर क्लिक करा…

नंदुरबार तालुक्यातील धडगाव तालुक्यातल्या खडक्या येथील रहिवासी आंतरसिंग काल्या वळवी यांनी दिलेल्या माहिती नुसार त्यांची विवाहीत मुलीला तालुक्यातीलच वावी येथील रहिवाशी रणजीत ठाकरे आणि अन्य एकजण बळजबरीने गाडीवर बसवुन दि 01 ऑगस्ट 2022 ला गावाबाहेर घेवुन गेले होते. तिच्या नातलगाला आलेल्या फोन मध्ये तिच्या सोबत रणजीतसह चार जणांनी चित्रपटाप्रमाणे कुकर्म करत असल्याचे तिने सांगत ते मला मारुन टाकतील असे रंजीलाने सांगितले. काही काळातच तिने वावी येथील एका आंब्याच्या झाडाला गळफास घेवुन आत्महत्या केल्याचा तिच्या कुटुंबीयांना फोन आला.तिचे कुटुंबीय घटनास्थळी पोहचण्याआधीच वावी गावातील लोकांच्या मदतीने तिचा मृतदेह उतरुन घेत पुरावे नष्ट केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला.या घटनेनंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचे पोलीसांना सांगुन देखील शवविच्छेदन अहवालात याबाबत कुठलीही तपासणी झाली नसल्याचे वडीलांनी सांगितले आहे.

शवविच्छदेनाच्या अहवालानंतर पोलीसांनी या घटनेप्रकरणी आत्महत्येचा गुन्हा नोदवुन घेतला.आणि या प्रकरणात संशयीत रणजीत ठाकरेसह तिंघाना अटक केली. मात्र मुलीवर बलात्कार होवुन तिची हत्या झाली असतांना पोलीसांच्या या भुमिकेमुळे मुलीचे प्रेत अंतिम संस्कारासाठी ताब्यात मिळाल्यानंतर आंतरसिंग काल्या वळवी यांनी त्याला अग्निदाग देवुन त्याचे अंतीम संस्कार केले नाही. त्यांनी आपल्या घरा शेजारच्या शेतात खड्डा करुन त्याठिकाणी मिठातच आपल्या मुलींच्या मृतदेहाला पुरले आहे. या संपूर्ण कठीण प्रसंगी खडक्याचे ग्रामस्थ देखील वळवी कुटुंबीयासमवेत भक्कम पणे पाठीमागे उभे असल्याचे दिसून आले आहे.

न्याय मिळावा यासाठी मुलीचे अंत्यसंस्कार न करता तब्बल 42 दिवस घरसमोरच मुलीचा मृतदेह मिठ्ठाच्या खडयात पुरुण ठेवल्याच्या हादरवून देणार्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणात दोषी नेमके कोण याचा शोध घेणे गरजेचे आहे.

https://youtu.be/uaLplyyOCcM click youtube link

WhatsApp
Follow by Email
error: