बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील पेट्रोलपंपांसह अन्य कॅश पॉइंटवरून रक्कम गोळा करत ती बँकांमध्ये डिपॉझिट करणान्या कंपनीचा कर्मचाऱ्याकडून १३ लाख ३८ हजार रुपये तिघांनी लुटल्याची घटना सोमवारी सकाळी सुमारास तालुक्यातील उंटावद शिवारात घडली आहे.तीन संशयितांनी केलेल्या या प्रकारामुळे तालुक्यात व्यवसायीकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच पीएसआय किरण बा-हे,संदीप मुरकुटे व पोलीस कर्मचारी शहर पोलिस कर्मचारी, डॉग क्वॉड,फॉरेन्सिक पथक,एलसीबीचे पथक घटनास्थळी दाखल झाले.तसेच घटने नंतर २:३० वाजेच्या सुमारास सर्वज्ञ नर्सरीच्या पुढे सावळदे शिवारात एका कापसाच्या शेतात चोरट्यांची मोटारसायकल व पैशांची असलेली खाली बॅग आढळून आली आहे.

सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास
पेट्रोलपंपांसह अन्य कॅश पॉइंटवरून रक्कम गोळा करत ती बँकांमध्ये डिपॉझिट करणाऱ्या कंपनीचा कर्मचारी जयपाल अशोक गिरासे रा. आमोदा हा आज सकाळी दहाच्या सुमारास उंटावद शिवारातील एका रिलायन्स कंपनीच्या पेट्रोलपंपावरील रक्कम घेऊन मुंबई-आग्रा महामार्गावरून खर्देकडे जाणाऱ्या रस्त्याने दुसऱ्या ठिकाणी कॅश घेण्यासाठी निघाल्यावर अंतर गेल्यानंतर युनिकॉर्न मोटारसायकलसह रस्त्यात थांबले होते.जयपाल गिरासे त्यांच्या जवळ पोहोचताच तिघांनी त्याला धक्का देत खाली पाडले व त्याच्या कडील १३ लाख ३८ हजार रुपयांची पैशांची बॅग चाकूच्या सहाय्याने बॅग कापून हिसकावत गिरासे कडील मोबाईल उसाच्या शेतात फेकून पसार झाले. त्यानंतर काही वेळाने जयपाल गिरासेने कंपनीच्या अधिकान्यांशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली. पुढील कारवाई सुरू आहे.