बातमी कट्टा:- मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सावळदे तापी पुलावरुन तापीत आयशर वाहन पडल्याची दुर्दैवी घटना आज दि 3 रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे. या वाहनातून क्लिनर बाहेर निघाला असून चालक वाहनासह पाण्यात बुडाला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर तालुक्यातील सावळदे तापी पुलावरुन भरधाव आयशर तापी पाण्यात पडल्याची घटना घडली आहे. पुणे येथून मध्यप्रदेश राज्यातील इंदौर कडे जात असतांना शिरपूर तालुक्यातील सावळदे तापी नदी पुलावरून आयशर नदीत कोसळली.
यादरम्यान आयशर मधील क्लिनरचे दैव बलवत्तर असल्याने तापी नदीत पोहत क्लिनर बाहेर निघाला आहे. सदर चालकाचे धर्मेंद्र नाव असून क्लिनरचे नाव आसल्याचे सांगितले जात आहे.घटनास्थळी नरडाणा पोलीस ,शिरपूर पोलीस दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरु आहे.


