भरधाव ट्रकने दोघांना चिरडले, भावाच्या उपचार खर्चासाठी दागिने गहान ठेवायला जातांना भीषण अपघात…

बातमी कट्टा:- लहान भावाच्या उपचाराच्या खर्चासाठी चांदीचे दागिने बोराडी येथे गहान ठेवण्यासाठी जात असतांना भरधाव ट्रकने मोटरसायकलीला धडक देत दोघांना ट्रकने चिरडल्याची घटना आज दि 18 रोजी सायंकाळी घडली आहे.घटनास्थळी पोलीस प्रशासनाने चालकासह ट्रक ताब्यात घेतली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार पानसेमल येथील शांतीलाल जिन्या पावरा वय 22 यांच्या लहान भावाला शिरपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.शांतीलाल पावरा हा शिरपूर तालुक्यातील हिसाळे येथे आपल्या नातेवाईकांकडे आला होता.भावाच्या उपचारासाठी पैसांची गरज भासत असल्याने चांदीचे दागिने बोराडी येथे गहान ठेवण्यासाठी आज दि 18 रोजी सायंकाळी हिसाळे येथून शांतीलाल जिन्या पावरा व संभु तेरसिंग पावरा रा.हिसाळे वय 53 हे मोटरसायकलीने बोराडीला जात असतांना मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सांगवी जवळील बोराडी फाटा येथे भरधाव वेगाने येणाऱ्या एम पी 09 एच एच 8047 क्रमांकाच्या ट्रकने मोटरसायकलीला धडक देत शांतीलाल व संभु पावरा यांना चिरडले.या भिषण अपघातात दोघांचा जागिच मृत्यू झाला.

घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी सांगवी पोलीस स्टेशनचे पथक दाखल होत ट्रक चालक व ट्रक ताब्यात घेत शांतीलाल व संभु पावरा यांचा मृतदेह शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

WhatsApp
Follow by Email
error: