बातमी कट्टा:- ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी तर्फे मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

आज दि 26 रोजी महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केल्याचे निषेधार्थ शिरपूर भारतीय जनता पार्टी तर्फे सकाळी 10 वाजेच्या सुमारास मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील गरताड ताजपुरी फाटयाजवळ “चक्काजाम आंदोलन” करण्यात आले आहे.यावेळी आंदोलकांनी विविध घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला.आंदोलनासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे,भाजपा प्रदेश सदस्य बबन चौधरी,शहराध्यक्ष हेमंत पाटील,जि.प.सदस्य भरत पाटील,सरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.