https://www.facebook.com/share/v/Vt146aLxppySYH5B/?mibextid=zLoPMf
बातमी कट्टा:- भारतीय जनता पार्टीच्या वतीने धुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी सौ. धरती निखिल देवरे यांची निवड जाहिर करण्यात आली.

धुळे येथील श्री विलेपार्ले केळवणी मंडळ कॅम्पस मध्ये 3 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टी तर्फे निरीक्षक म्हणून आमदार राजूमामा भोळे व भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी निरीक्षक म्हणून सर्व जिल्हा परिषद सदस्यांशी चर्चा केली.
फेसबुक व्हिडीओ साठी लिंक क्लिक करा
https://www.facebook.com/share/v/Vt146aLxppySYH5B/?mibextid=zLoPMf
भाजपा प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री ना. गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली दोन निरीक्षक बैठकीला येऊन सर्व सदस्यांशी चर्चा करून धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पदासाठी धरती निखिल देवरे यांचे नाव जाहिर करत आहोत. प्रदेशाध्यक्षांनी दिलेल्या पत्रात भाजपा जिल्हाध्यक्ष निवड करतील असे सुचवले होते, यानुसार ही निवड जाहीर करत आहोत.
बघा व्हिडीओ
https://www.facebook.com/share/v/Vt146aLxppySYH5B/?mibextid=zLoPMf
भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या उत्तम कारभारासाठी तसेच शासनाकडून भरघोस निधी मिळण्याच्या दृष्टीने जि.प. समन्वय समिती जाहीर करीत आहे. यामध्ये गिरीष महाजन, आमदार जयकुमार रावल, आमदार अमरिशभाई पटेल, खा. डॉ. सुभाष भामरे, खा. डॉ. हिना गावीत, आमदार काशिराम पावरा, भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी या 7 जणांची समन्वय समिती जाहिर करण्यात आली.
यावेळी आमदार राजूमामा भोळे, भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी, खा. डॉ. हिना गावित, खा. डॉ. सुभाष भामरे, माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, माजी मंत्री आमदार जयकुमार रावल, धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, प्रभारी जिल्हा परिषद अध्यक्ष देवेंद्र पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तुषार रंधे, माजी अध्यक्ष सुभाष देवरे, माजी अध्यक्ष शिवाजीराव दहिते, माजी जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, प्रा. अरविंद जाधव व अनेक मान्यवर उपस्थित होते.सर्व मान्यवरांनी नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
https://www.facebook.com/share/v/Vt146aLxppySYH5B/?mibextid=zLoPMf