बातमी कट्टा:- मध्यप्रदेश येथील उजैन येथे महाकालच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणांच्या चारचाकी आरटीका कारचा भीषण अपघात झाला या अपघात 3 जण जागीच ठार झाले तर 2 गंभीर तर 3 जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार मध्यरात्री मुंबई-आग्रा महामार्गावरील बाभळे फाट्याजवळ जलशुद्धीकरण केंद्रासमोर सोनगीर कडून नरडाणा कडे जाणाऱ्या कारचा अपघात झाला. अपघातात 3 जण ठार झाले 2 गंभीर तर 3 जण जखमी झाले आहेत. सदर तरुण कन्नड हून उज्जैन येथील महाकाल दर्शनासाठी जात असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. ही (ता. 20) शुक्रवारी रात्री एक वाजेच्या सुमारास अपघात झाला.
बाभळे फाट्याजवळ जलशुद्धीकरण केंद्रासमोर सोनगीर कडून नरडाणा कडे जाणाऱ्या M.H. 22.U 7128 क्रमांकाची आरटिका कार पलटली. कार चालकाचा ताबा सुटल्याने पलटून तीनशे मिटर अंतरापर्यंत कोलांट्या घेतली.
या अपघातात सचिन सुभाष राठोड (वय 27), गणेश भगवान हिरे (वय. 26), पवन विजय जाधव ( वय. 24), सर्व राहणार कन्नड जि.औरंगाबाद हे ठार झाले असून सागर समाधान पाटील (वय23) , गौरव कांबळे, किशोर राठोड, नवनाथ आण्णा बोरसे, शिवाजी जग्गु जाधव (वय 26) सर्व राहणार कन्नड हे जखमी झाले आहेत. हे सर्व तरुण कन्नड येथून श्रावणमास असल्याने उज्जैन येथील भोले महाकाल दर्शनासाठी जात असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.शनिवारी सकाळी अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव तसेच वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे, शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांनी अपघातस्थळी भेट दिली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक गजानन गोटे, एस. आर गांगुर्डे, व्ही. जे बर्डे, विजय पाटील, आदी पोलीस कर्मचारी हजर होते. शिंदखेडा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.