बातमी कट्टा:- ब्रेक फेल झाल्याने तोल जाऊन ट्रक विरुध्द दिशेला जाऊन ट्रकला व क्रुझर वाहनाला जोरादार धडक देत पलटी झाल्याची घटना घडली आहे.या भीषण अपघातात क्रुझर वाहनातील एकाच कुटुंबातील 10 जण जखमी झाले असून यातील चार जण गंभीर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार आज सकाळी मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील बिजासण घाटात इंदौर कडून मुंबईच्या दिशेने ट्रक जात असतांना अचानक ट्रकचा ब्रेक फेल झाला.भरधाव ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ट्रला विरुध्द दिशेने जात धुळ्याकडून मध्यप्रदेश कडे येणाऱ्या चालत्या ट्रकला व एम.एच.18 ए.जे 9015 क्रमांकाच्या क्रुझर वाहनाला जोरदार धडक देत पलटी झाला.या ट्रकच्या धडकेत क्रुझर मधील 10 जण जखमी झाले.त्यांना तात्काळ मध्यप्रदेश येथील सेंधवा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.यातील क्रुझर चालक मनोज जयस्वाल यांनी दिलेल्या माहिती नुसार धुळे येथील एकाच पारीवारातील सदस्य क्रुझर वाहनाने धुळे येथून मध्यप्रदेश येथील मगरखेडी येथे नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी जात असतांनाच अचानक ब्रेक फेल झालेल्या ट्रक विरूध्द दिशेला येऊन क्रुझर वाहानाला धडकला.
घटनास्थळी उपस्थितांनी तात्काळ रुग्णवाहिकांंना संपर्क साधला मात्र रुग्णवाहीका लवकर येऊ शकत नसल्याने मध्यप्रदेश पोलीसांनी स्वाताच्या वाहनांमधून जखमींना सेंधवा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.यात 10 पैकी चार जण गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे. बिजासण घटात अपघाताची मालिका सुरुच असुन मात्र वेळेत रुग्णवाहिका पोहचत नसल्याने आम जनतेला त्रास सहन करावा लागतो.