बातमी कट्टा:- भरधाव ट्रकने मोटरसायकलीला धडक दिल्याने भीषण अपघात घडला असुन यात मोटरसायकलीवर असलेले दोन तरूण अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर शहरातील मराठ गल्ली जवळ राहणारे दिपक संतोष चौधरी वय 26 व सागर भिकन मराठे वय 24 हे मोटरसायकलीने मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून सेंधवा कडे जात असतांना पळासनेर गावाजवळ इंदौर जाणाऱ्या भरधाव ट्रकने मोटरसायकलीला जोरदार धडक दिली यात मोटरसायकली वरील दिपक संतोष चौधरी वय 26 व सागर भिकन मराठे वय 24 हे दोन ही तरुण गंभीर जखमी झाले त्यांना उपस्थितांच्या मदतीने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र गंभीर जखमी असल्याने दोघांनाही धुळे येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.