भीषण अपघात,मुंबई आग्रा महामार्गावर मजूरांची पिकअप पलटली,जखमींमध्ये महिला पुरुषांसह चिमुकल्यांचा समावेश

बातमी कट्टा:- शेतातील काम आटोपून मजूरांना घरी घेऊन जात असतांना वाहन पलटी झाल्याची घटना घडली असून यात सुमारे 20 पेक्षा जास्त मजूर जखमी झाले आहेत.यात काही लहान बालकांचाही समावेश आहे.गंभीर जखमींना धुळे येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले असून काहींवर शिरपूर येथे प्राथमिक उपचार करण्यात येत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील आमोदे येथील मजूर आज दि 10 रोजी सायंकाळी पिकअप वाहनाने शिंदखेडा तालुक्यातील माळीच गोराणे भागात कापूस वेचणीसाठी गेले होते. सायंकाळी घरी परत येत असतांना कुरखळी फाट्या जवळ मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पिकअप पलटल्याने भीषण अपघात झाला.यात सुमारे 20 पेक्षा जास्त मजूर जखमी झाले आहेत.काही जखमी मजुरांना धुळे रवाना करण्यात आले आहे. तर काही मजुरांवर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात गर्दी जमली असून मदत कार्य सुरु आहे.या जखमींमध्ये लहान महिला पुरुषांसह चिमुकलींचा देखील समावेश आहे.

WhatsApp
Follow by Email
error: