भीषण अपघातात 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू…

बातमी कट्टा:- मोटरसायकलीने डबलशीट जात असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या कंटनेरने मोटरसायकलीला जोराने धडक दिल्याची घटना घडली यात मोटरसायकलवरील तरुणाचा जागिच मृत्यू झाला तर एक जण गंभीर असलयाची घटना घडली आहे.

शिरपूर तालुक्यातील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सांगवी गावालगत असलेल्या बोराडी फाट्याजवर दि २४ रोजी संध्याकाळी ६:३० वाजेच्या सुमारास सेंधव्या मध्यप्रदेश कडुन शिरपूर कडे भरधाव वेगाने येणाऱ्या आर.जे १४ जीएल.०२९७ क्रमांकांच्या कंटेनरने बोराडी फाट्याकडुन येणाऱ्या एम पी १० ई ६९४९ क्रमांकाच्या मोटरसायकलीला जोराने धडक दिल्याने नारबड्या सिताराम पावरा वय २६ रा सलाईपाडा बोराडी ता शिरपूर याचा जागिच मृत्यू झाला तर विरसिंग रतन पावरा हा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.घटनेची माहिती प्राप्त होताच सांगवी पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन अपघातील दोघांना रुग्णवाहिकेतून शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ पवार यांनी नारबड्या पावरा याला तपासून मयत घोषित केले तर जखमी विरसिंग पावरा याच्यावर उपचार सुरु आहेत.याघटनेनंतर महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.पोलीसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली.

WhatsApp
Follow by Email
error: