भीषण अपघातात युवकाचा जागीच मृत्यू…

बातमी कट्टा:- शिरपूर शहादा रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी झालेल्या वाहन अपघातात तऱ्हाड कसबे येथील 24 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

अपघातात प्रकाश गोविंदा वय 24 इ.तऱ्हाड कसबे या तरुणाचा मृत्यू झाला आहे.तऱ्हाड कसबे येथील प्रकाश बंजारा हे शिरपूर शहरात कामाला असतांना मंगळवारी 29 मार्च 2022 रोजी सायंकाळी घरी परत येत असताना भीषण अपघात झाला.प्रकाश बंजारा हा आपल्या एम एच 18- बियु 7998 या क्रमांकाच्या मोटरसायकलीने घरी परत येत असताना शिरपूर शहादा रस्त्यावर अर्थे शिवारात एम एच 19 सी 0283 क्रमांकाचे महिंद्रा जिप वाहन यांच्यात 8:30 वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला.या अपघातात प्रकाश बंजाराचा जागीच मृत्यू झाला. त्यास शिरपूर शहरांतील उपजिल्हा रुग्णालयात उपस्थित नागकांनी खाजगी वाहनाने हलविले, उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रकाश बंजारा मयत घोषित केले.अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जी डी पावरा गणेश सोनवणे,शांतीलाल पावरा यांनी घटनास्थळी धाव घेतली.त्याअगोदर नागरिकांनी खाजगी रुग्णालयात हलविले. पुढील कारवाई पोलिस करीत आहे

WhatsApp
Follow by Email
error: