बातमी कट्टा:- भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर वाहनाने मोटरसायकलीला धडक देत दोन मोटरसायकल स्वारांना चिरडल्याची घटना काल दि 9 रोजी रात्री मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र 3 वर घडला आहे.हा अपघात इतका भीषण होता की यात मोटरसायकलीचा पुर्णता चेंदामेंदा झाला आहे. याबाबत पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली आहे.
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पळासनेर गावाजवळ परमार ढाबा समोर 9 सप्टेंबर रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास आयशर व मोटरसायकलचा भीषण अपघात झाला असून या अपघातात दोन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे घटनेची माहिती मिळताच तात्काळ पळासनेर येथील ग्रामस्थांनी धाव घेत रुग्णवाहिका व तालुका पोलिसांना माहिती देत मदतकार्य सुरू केले आहे.
एम पी 09 एचजी 0950 क्रमांकाची आयशर इंदौर कडून शिरपूरच्या दिशेने भरधाव वेगाने बिजासन घाटातून येत असताना तालुक्यातील पळासनेर जवळ पळासनेर गावाकडे रस्ता ओलांडणाऱ्या ऐम.पी 10 एम आर 5011 क्रमांकाच्या हीरो शाईन दुचाकीला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला.तर आयशरने मोटरसायकल वरील दोघांना चिरडले हा अपघात एवढा भीषण होता की अपघातात मोटरसायकली सह दोघांचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता.घटनास्थळी महामार्ग पोलिसांनी व ग्रामस्थांनी धाव घेत मृतदेह रुग्णवाहीकेने पाठविण्यात आले.पोलीसांना मोटरसायकल क्रमांकाच्या आधारे या दोन्ही मयत व्यक्तींची ओळख पटवली असुन सोहन छोट्या मांडले वय 25 रा.जि.खरगोन व अनिल नथ्थु डावर वय 27 रा.बडवाणी या दोन्ही मित्रांचा अपघातात मृत्यू झाले आहे.याबाबत सांगवी पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली आहे.