
बातमी कट्टा:- वळण घेत असतांना चारचाकी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन झाडाला जाऊन धडकत खोल खड्ड्यात जाऊन पडली.या अपघातात एक महिलेचा जागिच मृत्यू झाला आहे तर चार ते पाच जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार मंगळवारी सायंकाळी साक्री तालुक्यातील छडवेल गावाहून धुळे तालुक्यातील लामकानी,बोरीसहून चिंचगाव गावाकडे येत असतांना बोरीस गावाच्या वळणावर भरधाव वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाडाला जाऊन धडकली.व त्यानंतर जवळच असलेल्या खड्ड्यात जाऊन कोसळली.
घटनेची माहिती होताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत वाहनात असलेले छडवेल ता.साक्री येथील प्रकाश आत्माराम पाटील आणि ओम प्रकाश पाटील व प्रकाश पाटील यांची आई हे जखमी झाले तर ज्योतिबाई प्रकाश पाटील यांचा जागिच मृत्यू झाला आहे.या सर्वांवर खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत.
