भीषण अपघातात लोकनियुक्त सरपंच यांचा जागिच मृत्यू…

बातमी कट्टा:- मोटरसायकलीने घरी जात असतांना भरधाव ट्रकने धडक देत सरपंचाला चिरडल्याची घटना आज दि 21 रोजी 5:30 वाजेच्या सुमारास घडली आहे.घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत ट्रकला पोलीसांच्या ताब्यात दिले असून चालक फरार झाला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा जवळील रामी येथील लोकनियुक्त सरपंच कडूजी रेवजी ठाकरे वय 72 हे आज सायंकाळी दोंडाईचा येथून बाजार करुन घरी येत असतांना दोंडाईचा रामी रस्त्यादरम्यान महादेव मंदिराजवळ दोंडाईचा कडून नंदुरबारच्या दिशेने जाणाऱ्या एम.एच 18 बीजे 6554 क्रमांकाच्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली.त्यात कडूजी ठाकरे खाली कोसळल्याने त्यांना डोक्याला जबर मार लागला ट्रक चालकाने सरपंच यांना चिरडून घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत धावडे गावाच्या पुढे नयन हॉटेल जवळ डंपरला अडविले मात्र ट्रक चालक फरार झाला.दोंडाईचा पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: