मंंत्रालयातील काम आटोपून धुळ्याला येतांना राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्षांच्या गाडीचा अपघात…

बातमी कट्टा:- मंत्रालयातील काम आटोपून धुळ्याला परत येतांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यांच्या चारचाकी गाडीचा अचानक टायर फुटल्याने भीषण अपघात झाला.या अपघातात गाडी तीन ते चार वेळा पलटी होऊन रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटली.मात्र सुदैवाने गाडीतील पाचही जण बचावले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले हे चालक किरण पाटील,महेंद्र शिरसाठ,राज कोळी,राजेंद्र चौधरी आदींसोबत मुंबई येथून मंत्रालयातील काम आटोपून धुळ्याकडे परत येत असतांना मध्यरात्रीच्या सुमारास टायर फुटल्याने एम.एच 18 बी.एच 21 या चार चाकी वाहनाचा अपघात झाला.यात गाडी तीन ते चार वेळा पलटी होत रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटली.

गाडी पलटी झाल्याने गाडीच्या संपूर्ण काचा बंद झाले यामुळे बाहेर येणे अवघड झाले होते मात्र जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांनी काचा फोडून गाडीच्या बाहेर प्रवेश केला.यावेळी बाहेर सर्वत्र आंधारमय परिस्थिती होती.

रणजित भोसले तात्काळ रस्त्यावर जाऊन मदतीसाठी ये जा करणाऱ्या वाहनांना थांबविण्याचा प्रयत्न करत होते मात्र रात्रीचा वेळ असल्याने कोणीही थांबत नव्हते.यावेळी एका वाहनचालकाने त्यांना ओळखले व मदतीसाठी ते धाऊन आले.त्यानंतर टोलनाकाचे कर्मचारी,काही प्रवासांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना चांदवड येथे उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर धुळ्यातून काही कार्यकर्ते व मित्र परिवार घटनास्थळी दाखल होऊन पाचही जणांना प्राथमिक उपचारानंतर धुळे येथे सुखरूप घेऊन आले.नशीब बलवत्तर असल्याने भीषण अपघातात पाचही जण सुदैवाने बचावले.

WhatsApp
Follow by Email
error: