
बातमी कट्टा:- मणिपूर येथे झालेल्या घटनेनंतर शिरपूरात डॅडी ग्रुपसह एकलव्य प्रतिष्ठान व रावण राजे फाऊंडेशन च्या वतीने मोर्चा काढत प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते.. यावेळी घोषणा देत मणिपूर घटनेचा विरोध दर्शविण्यात आला.
निवेदनात म्हटले की,मणिपूर येथे आरक्षणाच्या मुद्द्यावरून तीन महिन्यापासून आदिवासींवर अत्याचार सुरु आहेत यामध्ये राज्य व केंद्र दोघांमध्ये भारतीय जनता पार्टी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सरकार अस्तित्वात असून या राज्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत. दिनांक 3 मे 2023 रोजी आदिवासी समाजातील तीन महिलांवरती अत्याचार करून व त्यांचे लैंगिक शोषण करून जनसमुदायाने त्यांना पोलीस स्टेशन जवळील आपल्या कब्जात घेऊन गावात दिंड काढण्याचे प्रकार निंदनीय लज्जास्पद आपल्या भारत देशात झाली.
तरी तेथील पोलीस प्रशासनाने सरकारने कुठलेही प्रकारची दंगल मिटवण्याची व आदिवासींवर होत असलेल्या अन्याय विरुध्द कारवाई न करता दंगा करणाऱ्यांना संरक्षण देण्याचे काम केले आहे तरी अशा मुजोर राज्य सरकार त्वरित बरखास्त करून तिथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी व तिथे ज्या कोणी नराधमाने आदिवासींवर अन्याय अत्याचार व लैंगिक शोषित केले आहे यांना त्वरित अटक करून फास्टट्रॅक कोर्ट मध्ये चालून त्वरित फाशी देण्यात यावी अन्यथा आदिवासी समाज रस्त्यावर उतरून आमचे आदर्श तंट्या मामा बिल बिरसा मुंडा राघोजी भामरे समशेर पारथी खाजा नाईक यांच्यासारखे संपूर्ण भारतात आंदोलन करण्यात येईल याची राज्य सरकारने नोंद घावी असा ईशारा निवेदन द्वारे देण्यात आला आहे.