बातमी कट्टा:-धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणीला आज दि ३० रोजी सुरुवात झाली असून आठ टेबलांवर ही मतमोजणीची प्रक्रिया पार पडत आहे. मतमोजणी मध्ये पहिला कल हा महाविकास आघाडीच्या बाजूने दिसुन येत आहे.
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार कुणाल पाटील आणि खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.तर दुसरीकडे साक्री आणि शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती साठी आज मतदानाचे प्रक्रिया पार पडत असून सायंकाळी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणी दरम्यान पहिला कल महाविकास आघाडीच्या बाजूने दिसुन येत आहे.निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून उत्सुकता वाढली आहे.