बातमी कट्टा:- चोपडा शहादा रस्त्यावर शिरपूर शहरातील करवंद नाका ते निमझरी नाका दरम्यान आशीर्वाद हॉस्पिटलजवळ १० जुलै शनिवारी रात्री १ वाजेच्या सुमारास एका दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला असून या अपघातात एक जण जागीच मयत झाला आहे.तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शहरातील माळी गल्ली येथील रहिवाशी व नगरपालिका वसुली विभागातील वसुली पथकाचे प्रमुख किरण नामदेव चव्हाण हे रात्री एक वाजेच्या दरम्यान दुचाकी क्रं एमएच १८ बीएन ८९०५ हिचेवरून मित्र प्रफुल्ल जयंतीलाल गाथा रा.वसई जि.पालघर हे दोघे करवंद नाकाकडून निमझरी नाकाकडे येत असताना एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला या अपघातात दुचाकी घसरली त्यात अज्ञात वाहन प्रफुल्ल गाथा याच्या अंगावरून गेल्याने जागीच मृत्यू झाला.तर किरण चव्हाण गंभीर जखमी झाला आहे.
याप्रकरणी उपजिल्हा रुग्णालयातील डॉ.प्रसन्न जीत यांच्या आदेशाने वार्डबॉय प्रवीण पाटील यांनी खबर दिल्यावरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोना अशोक धनगर करीत आहेत