महात्मा जोतिबा फुले महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत पर्यावरण बचाव अभियान कार्यक्रम संपन्न !

बातमी कट्टा:- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिनानिमित्त सामाजिक वनीकरण विभाग धुळे वनक्षेत्र शिरपूर मार्फत पर्यावरण बचाव अभियान या विषयावर रंगभरण स्पर्धा व पोस्टर प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरण बचाव, वन्यजीव संरक्षण, सापांचे विविध प्रकार व मोलाची माहिती यासाठी खान्देश पर्यवारण संरक्षण मंडळ या संस्थेच्या पोस्टर प्रदर्शनाचे उदघाटनही यावेळी करण्यात आले.
               महात्मा ज्योतीबा फुले माध्य विद्यालय व सवित्रताई रंधे कन्या माध्यमिक विद्यालय शिरपूर येथील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यींनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. याप्रसंगी सामाजिक वनीकरण विभाग धुळे चे विभागीय वनअधिकारी श्रीमती रेवती कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.


              आज दि 13 रोजी शिरपूर शहरातील महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक विद्यालय येथे सामाजिक वनीकरण विभाग धुळे वनक्षेत्र शिरपूर तर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त पर्यावरण बचाव अभियान या विषयावर रंगभरण स्पर्धा व वन्यजीव तसेच पर्यावरण बचाव अभियान याविषयावर पोस्टर प्रदर्शन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी सावित्रीबाई रंधे कन्या माध्यमिक विद्यालय व महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
             पोस्टर प्रदर्शनाचे उदघाटन तसेच वृक्षाची पुजा करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्पर्धेत प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकवलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
        विभागीय वनअधिकारी रेवती कुलकर्णी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की भारताच्या इतिहासात देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या संघर्षाची व बलीदानाची जाणीव होऊन आपण आत्मनिर्भर व्हावे यासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा उपक्रम साजरी करण्यात येत आहे. जिथे पिकेल तीथे विकले पाहीजे, विद्यार्थ्यांनी देखील स्वालंबी व्हावे, स्वताचे कामे स्वता करण्याचा प्रयत्न करावा, आपण आत्मनिर्भर झालो तर देश आत्मनिर्भर होईल, आत्मनिर्भर भारत होणे गरजेचे असल्याचे सांगत पर्यावरणाबाबत यावेळी माहिती देण्यात आली.


         सहाय्यक वनसंरक्षक श्री भूषण पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात स्व कर्मवीर व्यंकटराव रणधीर (अण्णांच्या) जीवनातील प्रसंगावर दृष्टिक्षेप टाकत वृक्षांप्रतिचा जिव्हाळा, वृक्षारोपण व त्यांचंसंगोपन याबाबत 1999 च्या दशकातील प्रसंगांची आठवण करून दिली. वृक्षरोपणाचे व संगोपणाचे महत्व त्याकाळी स्व कर्मवीर व्यंकटराव रणधीर (अण्णा बाबा) पुरेसे प्रसार माध्यम नसतांना देखील शाळेतील व वसतिगृहातील विद्यार्थी याना स्वतः कळकळीने वृक्षलागवड, वृक्षसंगोपन व संरक्षण बाबत ते स्वतः महत्व पटवून देत असत. व त्याकाळापासूनच वृक्षरोपण बाबतची प्रेरणा देण्याचे खूप मोठे  काम त्यांनी केलेले आहे. त्यातूनच कर्मवीर संकुलात उत्तम असे नंदनवन आजरोजी उभा केल्याचे आपल्या दृष्टीक्षेपास पडते. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
           संस्थेचे मुख्याध्यापक श्री व्ही बी सोनवणे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना पर्यावरण वाचवण्याचे फायदे व पध्दतीबाबत मार्गदर्शन केले व एक मूल एक झाड ही संकल्पना राबवून आपला देश हा सुजलाम सुफलाम करावा ह्याबद्दल मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात उत्साह बघावयास मिळाला. या कार्यक्रमासाठी शिक्षक,विद्यार्थी व सामजिक वनिकरण विभागाचे कर्मचारी यांचे सहकार्य लाभले होते.याप्रसंगी सूत्रसंचालन उपशिक्षक श्री जे.पी.गोसावी सर यांनी केले तर प्रास्ताविक सहाय्यक वनसंरक्षक श्री भूषण पाटील यांनी केले, तसेच आभार वनरक्षक निलेश थोरात यांनी मानले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तसेच अध्यक्ष सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनअधिकारी रेवती कुलकर्णी यांच्यासह सहाय्यक वनसंरक्षक भूषण बी.पाटील, सा.व क्षेत्र शिंदखेडा वनक्षेत्रपाल  मंगेश कांबळे, मुख्याध्यापक व्ही.बी.सोनवणे, वनपाल सविता पाटील, वनरक्षक अस्मिता पगारे, वनपाल शीतल माळी, वनरक्षक निलेश थोरात, एम.पी.पाटील व व्ही.बी.सोनवणे, पत्रकार अमोल राजपूत, पत्रकार भिका चव्हाण,नवल कढरे, कार्यालयीन सहाय्यक योगेश्वर मोरे, कैलास पावरा, विजू मरसाळे, कनैय्या पावरा, वनमजुर व कर्मचारी, महात्मा जोतिबा फुले माध्य विद्यालय व सावित्रीबाई कन्या माध्य विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच आदी जण उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षक व खान्देश पर्यावरण संरक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री हेमंत शेटे, सहाय्यक वनसंरक्षक श्री भूषण पाटील, वनक्षेत्रपाल श्री कालिदास सैंदाने,वनरक्षक निलेश थोरात, महात्मा जोतिबा फुले महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व सावित्रीताई रंधे कन्या माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांचे सहकार्य लाभले.

WhatsApp
Follow by Email
error: