महाराणा प्रतापसिंहजी यांच्या जयंती निमित्त शिरपूर तालुका कार्यकारणी गठीत…

बातमी कट्टा:- राष्ट्रगौरव महाराणा प्रतापसिंह यांच्या 482 व्या जयंती निमित्त शिरपूर तालुका महाराणा प्रताप उत्सव समिती गठीत करण्यात आली. यात अध्यक्षपदी नगरसेवक देवेंद्रसिंह (भुरा) जामसिंह राजपूत तर उपाध्यक्ष पदी बोरगाव चे उपसरपंच योगेंद्रसिंह सिसोदिया, कल्पेशसिंह सुभाषसिंह जमादार व राजसिंह सिसोदिया तर कोषाध्यक्ष पदी भरतसिंह गोकुळसिंह राजपूत (शिवसेना उपजिल्हाप्रमुख), भुपेशसिंह गुलाबसिंह परदेशी यांची कार्याध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.

शिरपूर तालुक्यात महाराणा प्रताप जयंती मिरणुकीची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होत असते. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने, गुलाल ऐवजी फुलांचा वर्षाव करीत घोडे, हत्ती, राजपुताना पेहराव इ मुळे तालुक्यासह जिल्ह्यात जयंतीचे कौतुक केले जाते. आजपर्यत तालुक्यात कुठल्याही जयंती दरम्यान गालबोट लागलेले नाही.

कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून जयंती साजरी करता आली नाही. यावर्षी तिथीप्रमाणे 2 जून रोजी क्रांती नगर ते आमोदा महाराणा ग्राउंड अशी महाराणा प्रताप मिरवणूक निघणार आहे व राजस्थान येथील प्रमुख मान्यवरांच्या व्याख्यानाने समारोप होणार आहे.

शिरपूर तालुका महाराणा प्रताप उत्सव समिती खालील प्रमाणे –
अध्यक्ष : श्री देवेंद्रसिंह जामसिंग राजपूत – नगरसेवक शिरपूर
उपाध्यक्ष : श्री योगेंद्रसिंह दाजभाऊ सिसोदिया, उपसरपंच बोरगाव
उपाध्यक्ष : कल्पेशसिंह सुभाषसिंह जमादार
उपाध्यक्ष : राजसिंह प्रकाशसिंह सिसोदिया
कोषाध्यक्ष : भरतसिंह गोकुळसिंह राजपूत – शिवसेना उपजिल्हा प्रमुख
कार्याध्यक्ष : श्री भुपेशसिंह गुलाबसिंह परदेशी,
धिरजसिंह केवलसिंह राजपूत, मयूरसिंह देवेंद्रसिंह राजपुत, प्रदीपसिंह हिम्मतसिंह राजपूत, अमोलसिंह दरबारसिंह राजपूत, नेपालसिंह उदयसिंह राजपूत तसेच युवा समिती मध्ये कुणाल, आकाश, राहुल, जयदीप, भूषण, प्रशांत, सचिन, रोहित, यशपाल, राज, करण, शशिपाल, कुणाल, स्वप्निल, दिनेश, भावेश व गौरव राजपूत यांची नेमणूक करण्यात आली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: