महाराष्ट्र एनजीओ समितीच्या धुळे जिल्हा उपाध्यक्ष पदी जितेंद्र गिरासे यांची नियुक्ती..

बातमी कट्टा:-  महाराष्ट्र एनजीओ समितीचे राज्य अध्यक्ष व पदाधिकारी यांची सौरभ मंगल कार्यालय दोंडाईचा येथे बैठक व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते त्या बैठकीत जिल्हा स्तरावर समिती स्थापन करण्यासह समितीला बळकटी देण्यासाठी विचारमंथन करण्यात आले. यात नीती आयोग मान्यता प्राप्त महाराष्ट्र एनजीओ समितीच्या धुळे जिल्हा अध्यक्ष म्हणून ऍड सचिन जाधव यांची तर धुळे जिल्हा उपाअध्यक्ष पदी दोंडाईचा येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी दोंडाईचा शहर अध्यक्ष भाजपा (शिक्षक आघाडी) जितेंद्र गिरासे यांची निवड करण्यात आली.
बैठकीत महाराष्ट्र एनजीओ समिती राज्य अध्यक्ष डॉ युवराज येडुरे यांनी आगामी शासनाच्या सर्व योजना व सी एस आर निधीच्या पार्श्वभूमीवर स्वयंसेवी संस्थांना सक्षम करण्यासाठी राज्य पदाधिकाऱ्यांची व जिल्हा पदाधिकाऱ्यांची शासन स्तरावर समिती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

जितेंद्र गिरासे यांनी सामाजिक, सांस्कृतिक,आरोग्य तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय व प्रभावीपणे काम करत आहेत. त्यात त्यांचा सर्वात महत्वाकांशी प्रोजेक्ट म्हणजे त्यांच्या संस्थे मार्फत 12 वी सायन्स च्या विद्यार्थ्यांना मोफत MHT-CET /JEE/NEET या कोर्सेस साठी पालकांना हजारो रुपये खर्च करावा लागतो परंतु तो कोर्स संस्थेच्या Achievers classes द्वारे मोफत उपलब्ध करुन देण्यात येतात त्याची दखल घेत डॉ युवराज येडुरे यांनी जितेंद्र गिरासे सर यांची जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती जाहीर केली. याप्रसंगी राज्य उपाध्यक्ष डॉ सुनीता मोडक,राज्य चिटणीस लक्ष्मण डोळस तसेच राज्य सम्पर्क प्रमुख पुजा खडसे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ येडुरे बोलतांना म्हणालेत की अनेक मोठ्या कंपनी आहेत जे चांगले काम करणाऱ्या संस्थाना सी एस आर च्या माध्यमातून फंडींग करतात परंतु त्यांना त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे किंवा सी एस आर चे काम मिळवण्यासाठी जाचक अटी त्यांना सम्पूर्ण मार्गदर्शन करून तो निधी व शासनाच्या विविध योजना आहेत त्यांचा लाभ स्वयंसेवी संस्थांना मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासन कार्पोरेट कंपन्या व सेवाभावी संस्था यांच्यातील दुवा म्हणून महाराष्ट्र एन जी ओ समिती काम करणार असून स्वयंसेवी संस्थांची बांधणी करणे,सीएसआर कागदपत्रांची पूर्तता करून योग्य सेवाभावी संस्थेला तो सीएसआर फंड मिळवून देणे व स्वयंसेवी संस्थांचे इतर प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र एन जी ओ समिती च्या माध्यमातून काम करणार असुन जिल्हा पातळीवरील दिलेली जबाबदारी सर्वांना सोबत घेऊन कामास कटिबद्ध राहील असे सांगितले.

WhatsApp
Follow by Email
error: