बातमी कट्टा:- महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे आज सकाळी धुळे महानगर पालीकेसमोर आंदोलन करण्यात आले.यावेळी त्यांनी शाळेसंदर्भात विविध मागणी निवेदनाद्वारे केली आहे.प्रवेशाद्वारावर विविध घोषणा देत आंदोलन करण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले की,अनेक खाजगी शाळांनी त्यांची शैक्षणिक फी वाढवली ओनलाईन पध्दतीचे शिक्षण सुरु केले.यामध्ये ज्या विद्यार्थ्यांची परिस्थिती आर्थिक द्रुष्ट्या सक्षम होती त्यांचे शिक्षण चालु आहे.मात्र ज्यांची परिस्थिती अत्यंत गरीबीची, हलाखीची आहे त्यांचे शिक्षण मात्र थांबले आहे. त्यात सरकारने आता जाहीर केले की लवकरच शाळा सुरु होणार आहेत. मात्र महापालिका शाळेची परिस्थिती पाहता अनेक शाळा मोडकळीस आले आहेत.तर अनेक शाळांवर स्थानिक गुंडांनी अतीक्रमण केले आहे.
मोफत शिक्षण घेणे हा प्रत्येकाचा मुलभूत अधिकार आहे. त्या शिक्षणाची सोय करुन देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.त्यासाठी नागरिकांकडून शिक्षण कर वसूल केला जातो.मात्र त्यांचा सुयोग्य वापर केला जात नाही.सध्या वाढत्या महागाईच्या परिस्थितीत शिक्षण घेणे कठीण झाले आहे.अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना मनापाच्या शाळेच्या माध्यमातून शिक्षणाची सोय उपलब्ध करुन दिल्या नाहीत. तर भविष्यात अशा गरीब विद्यार्थ्यांचा शिक्षण बंद होण्याच्या धोका नाकारता येय नाही. म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे मनपाला जाग यावी म्हणून शाळा भरवली जावून आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येत आहे असल्याचे निवेदनात म्हटले आहे.यावेळी मनविसे तर्फे जिल्हाध्यक्ष प्रसाद देशमुख यांसह गौरव गिते,विठ्ठल पगारे,भाटी धनगर,गुरु पाटील आदींसह आंदोलन केले.