बातमी कट्टा:- तालुका कृषी अधिकारी कार्यालय, शिरपूर जि.धुळे येथील माहिती अधिकाराचा बनावट अर्जाचा गैरवापर करुन कार्यालयाला व कार्यालयातील कर्मचाऱ्यांना हेतुपुरस्कर त्रास देणाऱ्या कर्मचाऱ्यावर नियमानुसार कार्यवाही होणेसाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी धुळे यांना महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना शिरपूर यांच्या वतीने निवेदन देण्यात आले होते.परंतु सदर प्रकरणात कुठलीही कार्यवाही न झाल्याने सर्व कृषी सहाय्यक संर्वगात तिव्र असंतोषता निर्माण झालेला आहे.

संबधीत कर्मचाऱ्यावर नियमानुसार चौकशी करुन कार्यवाही होत नाही तोवर शिरपूर तालुक्यात कार्यरत सर्व कृषी सहाय्यक खालील टप्पयानुसार असहकार आंदोलनात उतरणार आहेत.
आंदोलनाचे टप्पे :

1) दि.02/07/2021 रोजी सर्व कृषी सहाय्यक काळया फिती लावून कामकाज करतील.
2) दि.05/07/2021 रोजी सर्व कृषी सहाय्यक कार्यालयाच्या व्हाट्स अप ग्रुप मधुन बाहेर पडतील.
3) दि.06/07/2021 रोजी पासुन सर्व कृषी सहाय्यक असहकार आंदोलन करणार आहेत.
वरील आंदोलनाचे टप्पे लक्षात घेता कृषी सहाय्यक कुठेही एकत्र येवून घोषणाबाजी करणार नाहीत, धरणा देणार नाहीत, कायदा व सुव्यवस्था बाबत अडचण निर्माण करणार नाहीत शिवाय कोवीड परिस्थीतीचे गांभीर्य लक्षात घेता कोठेही नियमांचे उलघ्घन होणार नाही याबाबत संघटना दक्षता घेणार आहे.