महाराष्ट्रातील १३२ शासकीय औद्योगिक संस्थांना नवी ओळख, शिंदखेडा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सहकार महर्षी दादासाहेब रावल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नामकरण

बातमी कट्टा:- कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्रातील १३२ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण यशस्वीपणे करण्यात आले आहे. प्रथम १४ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाद्वारे घेण्यात आला होता.

महाराष्ट्रातील फक्त २ औद्योगिक संस्था सोडल्या तर इतर औद्योगिक संस्थांना या आधी कोणत्याही प्रकारची नावे नव्हती. त्यांनतर कौशल्य विकास विभागाद्वारे महाराष्ट्रातील शासकीय औद्योगिक संस्थांसाठी नागरिकांकडून नावाबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे राज्यातील १३२ आयटीआयचे नामकरण करण्याचा निर्णय आज जाहीर करण्यात आला. त्यानुसार अकोला, अमरावती, कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, धाराशिव, धुळे, नंदुरबार, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, बीड, बुलढाणा, भंडारा, मुंबई उपनगर, यवतमाळ, रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, सांगली, सातारा, सोलापूर आणि हिंगोली जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक संस्थांना नवीन ओळख मिळाली आहे.

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सहकार महर्षी दादासाहेब रावल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नामकरण करण्यात आले आहेत.


WhatsApp
Follow by Email
error: