महावितरण वीज कर्मचाऱ्याला शिवीगाळ करीत मारहाण…

बातमी कट्टा:- शिरपूर शहरातील एस.पी.डी.एम कॉलेजच्या गेटसमोर दुपारी वीज कर्मचाऱ्याला अज्ञात कारणांनी एका कडुन शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असून शहर पोलीस ठाण्यात सदर कर्मचाऱ्याने तक्रार दाखल केली आहे.

आनंद रमेश बिलाडे वय ३४,वायरमन MSEB कार्यालय, शिरपूर यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ते शनिवारी 11 डिसेंबर रोजी बुधेलाल नगर येथून ग्राहकाचे वीज मीटर रिप्लेसमेंट करून परत येत असताना एस पी डी एम कॉलेज गेटसमोर सार्वजनिक रस्त्यावर विठ्ठल लॉन्सच्या पाठीमागे, लक्ष्मीविहार कॉलनीत राहणारे मनोज तुळशीराम बोरसे याने दुचाकी थांबवत वीज बिलात वाढ करून सांगत शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.दाखल तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.

WhatsApp
Follow by Email
error: