बातमी कट्टा:- गेल्या सहा दिवसांपासून घरातील व्यक्ती आपल्या न्याय हक्कासाठी आमरण उपोषणाला बसलेले असतांना लक्ष दिले जात नसल्याने संतप्त महिलांनी गटविकास अधिकारी यांना घेराव घालत त्यांचा प्रवेशद्वाराबाहेर रस्ता रोखण्याठी ठाण मांडून बसले होते. यावेळी गटविकास अधिकारी यांनी महिलांची समजूत काढत बांधकाम अभियंतांनी लेखी अर्ज दिल्याने महिलांनी रस्ता मोकळा केला.
शिरपूर तालुक्यातील अहिल्यापूर येथील शेतकरींनी आपल्या मागणीसाठी शिरपूर बांधकाम विभाग,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले होते.मात्र त्यांच्या निवेदनावर दखल घेतली गेली नसल्याने शेतकऱ्यांना उपोषणाचे शस्त्र उपसावे लागले.त्या शेतकऱ्यांचा सहाव्या दिवसही उपोषण सुरुच आहे.तर दि 12 रोजीने एका शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला होता.
अहिल्यापूर येथे गावापासून उत्तरेकडील दिशेकडे जाणारा अमरधाम रस्ता लगत शेतकरी वहिवाट नाला आहे त्या नाल्यामध्ये पाच ते सात नाल्याचे पाणी व शेतीचे पाणी एकत्र येते तेथे आमदार निधीतून 12 लाखांचे काम मंजूर करण्यात आले व तेथे पुलाचे लहान बांधकाम करुन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाव व कचरा साचत आहे. यामुळे ते शेतकऱ्याचा व मजूर वर्गाचा वापर पुर्ण बंद झाला आहे. व यापुढे शेतकऱ्याचा हंगामी माल देखील तेथून काढता येणार नाही.यापूर्वी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम नसून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची हानी नव्हती तरी तेथे काँक्रीटचे पाईप टाकल्यामुळे पुर्ण पणे रस्ता ब्लॉक झाला आहे. यामुळे शेतकऱ्याना मोठी अडचण निर्माण झाली आहे.
याबाबत दि 28 जून रोजी शेतकऱ्यांनी शिरपूर गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन दखल घेण्याबाबत निवेदन दिले होते.त्यानंतर दि 13 जुलै रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.वारंवार निवेदन देऊन देखील दखल घेतली जात नसल्याने अखेर दि 8 ऑगस्ट रोजी अहिल्यापूर येथील सहा शेतकरींनी पंचायत समिती बांधकाम विभागाबाहेर उपोषण सुरु केले आहे.
एका शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचे समजताच अहिल्यापूर येथील महिलांनी शिरपूर पंचायत समिती बाहेर सुरू असलेल्या उपोषणाच्या ठिकाणी भेट दिली.संतप्त महिलांनी गटविकास अधिकारी यांचा पंचायत समिती प्रवेशद्वारावर रस्ता रोखून महिलांनी घेराव घालत याबाबत जाब विचारला.सायंकाळी 6 वाजेपासून रात्री 8:30 वाजेपर्यंत पंचायत समिती प्रवेशद्वार बाहेर महिला ठाण मांडून बसले होते.अखेर गटविकास अधिकारी यांनी समजूत काढत बांधकाम अभियांनी लेखी आश्वासन दिल्याने महिलांनी रस्ता मोकळा केला.घटनास्थळी शिरपूर पोलीस दाखल झाले होते.