महिलेचा खून करणाऱ्या आरोपीला “जन्मठेप”,शिरपूर पोलीसांनी केला होता तपास…

बातमी कट्टा- मागील भांडणाची कुरापत काढत मारहाणीत संतापाच्या भरात डोक्यात लोखंडी फावडीने वार केल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना २०१८ मध्ये घडली होती.त्याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर शिरपूर पोलीसांनी संशयित आरोपीला शोधून अटक केली होती. त्याच्या विरोधात मुदतीत दोषारोप दाखल करण्यात आले होते.धुळे प्रमुख जिल्हा व मा.सत्र न्यायालयाने संशयित आरोपीला जन्मठेपेची शिक्षा व ५ हजार रुपये दंड ठोठावला आहे.

दि १९ ऑक्टोबर २०१८ रोजी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील कळमसरे येथे मागील भांडणाची कुरापत काढून निलाबाई सहादू ठाकरे यांच्याशी ठाणसिंग मोहन भील वय ४८ याने वाद घालत मारहाण केली.संतापात ठाणसिंग भील याने निलाबाई हिच्या डोक्यात लोखंडी फावडीने वार केले. निलाबाई रक्याच्या थारोळ्यात खाली कोसळली. घटनेनंतर ठाणसिंग भील हा घराला कुलूप लावून पळून गेला होता. याप्रकरणी मयत निलाबाई यांचा मुलगा केशव सहादू ठाकरे याच्या फिर्यादीवरून शिरपूर शहर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीस निरीक्षक संजय सानप,पोलीस हेडकाँस्टेबल ललित पाटील, रवींद्र माळी,पोलीस नाईक तुकाराम गवळी यांनी संशयित आरोपी ठाणसिंग भील याला शोधून अटक केली. त्याच्या विरुद्ध मुदतीत दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. मा.न्यायालयात कामकाज सुरु असतांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एच.मोहम्मद यांनी या खटल्यातील संपूर्ण साक्षीदार, पंच साक्षीदार, तपासी अधिकारी व पुराव्यांचा आणि सरकारी वकील म्हणून गणेश पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालासह प्रभावी मांडली.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालांचा सांगोपांग विचार करुन ठाणसिंग मोहन भील याला जन्मठेपेची शिक्षा तसेच पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिन्याची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली.याकामी जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तवर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: