बातमी कट्टा:- वन विभागातील शिवारात अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला असून महिलेचा खून झाल्याचे निदर्शनास आले आहे.या अनोळखी महिलेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले असून मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात असल्याचे निदर्शनास आले आहे.घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल होऊन पुढील कार्यवाही सुरु आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे तालुक्यातील बोरविहीर शिवारात वनविभागाच्या कंपार्टमेंट 308 मधील वन विभागातील शिवारात बोरविहिर जवळील रस्त्यालगत एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. सदर महिलेचा खून करण्यात आला असून रक्ताच्या थारोळ्यात असल्याचे निदर्शनास आला आहे.या महिलेच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मृतदेहाजवळ मोबाईल, चार्जर, चप्पल, दारूची बॉटल अशा वस्तू मिळून आल्या आहेत.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासनाचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.प्रशांत बच्छाव,उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे, तालुका पोलीस निरीक्षक हेमंत पाटील,सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे,चौधरी, प्रभाकर बैसाणे,श्रीकांत पाटील आदींसह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.पोलीसांकडून पुढील कारवाई सुरु आहे.