महिलेची आत्महत्या,पोलीस पाटील पतीसह दिर,सासु सासऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल..

बातमी कट्टा:- गळफास लावलेल्या स्थितीत २९ वर्षीय महिलेचा राहत्या घरात मृतदेह आढळून आल्याची खळबळजनक घटना काल दि २७ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली होती.घटनेनंतर मयत महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी शिरपूर पोलीस स्टेशनात गर्दी केली होती. मयत महिलेच्या पती,दिर,सासू, सासरे यांच्या विरुध्द आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार काल दि २७ रोजी शिरपूर तालुक्यातील टेकवाडे येथे राहणाऱ्या रोहिणी अतुल शिरसाठ या महिलेचा राहत्या घरी दोरीने गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला.त्यांना शांतीलाल भगवान शिरसाठ यांनी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ.दिव्या तवर यांनी रोहिणी शिरसाठ यांना मृत घोषित केले.घटनेची माहिती मिळताच रोहिणी यांचे माहेरच्या नातेवाईकांंनी पोलीस स्टेशन व उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती.

शहादा तालुक्यातील अलखेडा येथील माहेर असलेल्या रोहिणी अतुल शिरसाठ यांचे टेकवाडे येथील अतुल राजेंद्र शिरसाठ यांच्या सोबत तिन वर्षापूर्वी विवाह झाला होता.
त्यांना दिड वर्षाचा एक मुलगा असून अतुल शिरसाठ हे टेकवाडे गावाचे पोलीस पाटील म्हणून कार्यरत आहे.

काल दि २७ रोजी सायंकाळी रोहिणी शिरसाठ यांच्या मृत्यूच्या घटनेनंतर रोहिणी सिरसाठ यांच्या माहेर येथील महिलांसह नातेवाईकांनी पोलीस स्टेशनात व शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती.आज दि २७ रोजी मयत रोहिणी शिरसाठ यांचे भाऊ रविंद्र हिलाल रामराजे वय ३७ रा.अलखेड तालुका शहादा यांनी शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे रोहिणी शिरसाठ यांचे पती अतुल राजेंद्र शिरसाठ,दिर राकेश शिरसाठ, सासु सुनंदा शिरसाठ व सासरे राजेंद्र शिरसाठ यांच्या विरुध्द रोहिणी शिरसाठ यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

WhatsApp
Follow by Email
error: