माजी सरपंच महिलेचा गळफास स्थितीत आढळला मृतदेह…

बातमी कट्टा:- माजी सरपंच महिलेचा राहत्या घरात गळफास स्थितीत मृतदेह आढळून आला आहे. या बाबत पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.याबाबत अधिक माहिती मात्र मिळु शकलेली नाही.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील माजी सरपंच रेखाबाई विजय वाडीले वय 40 या मुलांच्या शिक्षणासाठी शिरपूर येथील सदाशिव नगर येथे राहत होते.आज सकाळी घरात त्यांचा गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी रेखाबाई वाडीले यांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.घटनेची माहिती मिळताच शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात गर्दी झाली होती. याबाबत शिरपूर शहर पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: