माथेफिरुने शेतातील कपाशी उपटून फेकली…

बातमी कट्टा:- अज्ञात माथेफिरूने चक्क शेतातील उभ्या कापूस पिकाचे झाडे उपटून फेकत मोठे नुकसान केल्याचे आज सकाळी शेतकऱ्याला निदर्शनास आले आहे. याआधी देखील कापूस पिकाचे झाडे उपटून फेकण्यात आले होते तर बोरअवेलचा पाईप तोडून फेकण्यात आला होता.या घटनेमुळे संबधित शेतकरीवर मोठे संकट उभे राहिले आहे.

यासह व्हिडीओ वृत्तांत बघण्यासाठी चैनल सबस्क्राईब करा

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील बोरगाव येथील शेतकरी अर्जुण चिंधा पाटील यांची बोरगाव शिवारात शेती आहे.त्यांच्या शेतीचे चंदु हिरालाल पाटील हे काम सांभाळत असतात.मेस महिन्याच्या अखेरीस चंदु पाटील यांनी या शेतात कापुस पिकाची लागवड केली होती. या परिसरातील हे सगळ्यात चांगले कापसाचे पिक उभे राहिले होते एकाच झाडाला 20ते 25 कापूसाचे बोंड आले आहेत.10 ते 15 दिवसात या कापूस झाडांवरील बोंडे फुटुन त्यातून कापूस पिकाचे उत्पन्न येणार होते.मात्र अज्ञात माथेफिरूने चक्क या शेतातील 100 ते सव्वाशे झाडे उपटून फेकत मोठे नुकसान केले आहे.आज सकाळी शेतकरी शेतात गेले असतांना त्यांना या झाडे उपटून फेकल्याचे निदर्शनास आले.

याआधी देखील चंदु पाटील यांच्या शेतातील कापूस पिकाचे झाडे उपटून फेकत मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे तर दहा दिवसांपूर्वी यांच्या शेतात बोरअवेलच्या पाईप फोडून नुकसान केल्याचे शेतकरींनी सांगितले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: