माय-लेकीचा निर्घृण खून,अंगणात झोपलेले असतांना खून

बातमी कट्टा:- घराबाहेर अंगणात झोपले असतांनाच दोन महिलांचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली असून संशयिताचा पोलीसांकडून शोध सुरु आहे.रात्रीच्या सुमारास माय लेकीचा खून झाल्याचे उघड झाले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे तालुक्यातील तरवाडे गावात दोन महिलांचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.धुळे सोलापूर महामार्गालगत घराबाहेर अंगणात माय लेकी झोपलेले असतांना रात्रीच्या सुमारास धारदार शस्त्राने वार करत खून करण्यात आल्याची घटना घडली आहे.यात चंद्रभागा भावराव महाजन वय 65 आणि त्यांची मुलगी वंदनाबाई महाले वय 45 या दोघांचा मृत्यू झाला आहे.घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले असून संशयिताचा शोध सुरु आहे.खूनाचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: