मालट्रकची तीनचाकी रीक्षाला जोरदार धडक,भीषण अपघातात 6 जण जखमी…

शिरपूर शहादा रस्त्यावरील भामपुर फाट्यावर ट्रक ने अँप्पेरिक्षाला जोरदार धडक दिल्याने ॲपेरिक्षा मधील सहा जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली आहे.अपघातातील 3 गंभीर जखमीना धुळे येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले आहे.


शिरपूर येथून प्रवाशी घेऊन शहादा रस्त्याने भामपूर येथे जात असलेल्या अपेरिक्षाला टेकवाडे ते भामपूर फाट्यादरम्यान शिरपूर कडे जाणाऱ्या जीजे 12 एव्ही 6599 या मालट्रकने समोरून जोरदार धडक दिल्याने अपघात झाला आहे.या अपघातात भामपूर येथील 2 पुरुष व 4 महिला असे 6 जण जखमी झाले आहेत.जखमींना तात्काळ वाहनाने शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.त्यात मनीषा सुभाष महाजन वय 40 शुभांगी रवींद्र दोरिक वय 30 पुष्‍पाबाई सुभाष दोरिक वय 50 हे अधिक गंभीर जखमी असल्याने त्यांना धुळे येथे हलण्यात आले आहे तर सुभाष हरचद पाटील वय 65 मंगलाबाई सुभाष पाटील वय 60 दिपक सुभाष पाटील वय 42 हे किरकोळ जखमी झाले आहेत त्यांच्यावर शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉ हिरेन पवार यांनी उपचार केले. याप्रकरणी वार्डबॉय अशोक बिरारी यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात खबर दिल्याने वाहन अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. शिरपूर शहादा रस्ता हा संपूर्ण खड्डामय झाला असल्याने रोजच अपघाताची मालिका सुरू असून सुद्धा संबंधित अधिकारी व ठेकेदार प्रवाश्यांच्या जीवावर उठले असल्याची प्रतिक्रिया वाहन चालकाकडून दिली जात आहे.

WhatsApp
Follow by Email
error: