बातमी कट्टा:- ऊस तोडणीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर मावस भावानेच अत्याचार केल्यामुळे गरोदर झालेल्या अल्पवयीन युवतीने दि 14 रोजी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.याबाबत पोलीस स्टेशनात संशयिता विरुध्द मुलीच्या वडीलांनी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार दि 14 रोजी दुपारी अल्पवयीन मुलीने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली होती.या धक्कादायक घटनेनंतर दि 16 रोजी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी शिरपूर तालुका पोलीस स्टेशनात फिर्याद दाखल केली आहे.फिर्यादीत म्हटले की,दि 12 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता त्यांच्या पत्नीने सांगितले की मागील काही दिवसापासून मुलगी तणावात आहे.ती गरोदर असल्याचा पत्नीला संशय असल्याने मुलीला विश्वासात घेत विचारले असता पिडीत मुलीने सांगितले होते की, नोव्हेंबर 2021 साली शिरपूर तालुक्यातील टेंभे टेकवाडे येथे ऊस तोडणीसाठी संपूर्ण कुटुंब गेले होते.तेव्हा तीचा मावस भाऊ सोमनाथ पावरा हा तीच्याशी वेळोवेळी लगट करत होता व ऊस तोडणी कामाच्या ठिकाणी व ऊसतोडणीच्या कामावरून गावात परत आल्यावर एकांत साधुन शारीरिक संबध करत होता.
मार्च महिन्यात ऊसतोडणीचे काम संपल्यावर कुटुंबसह मुलगी घरी आली.त्यानंतर सोमनाथने केलेल्या शारीरिक संबधातून गरोदर झाल्याचे मुलीला समजले.याबाबत पिडीत अल्पवयीन मुलीने सोमनाथला फोनवर गरोदर असल्याची माहिती दिल्यानंतर सोमनाथने टाळाटाळ केली. यामुळे दि 14 रोजी तीने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली.याबाबत मुलीच्या वडिलांनी संशयित सोमनाथ पावरा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.