मासे घेऊन जाणारी आयशर पलटी,मासे पळविण्यासाठी गर्दी…

बातमी कट्टा:- आयशर चालकाचा ताबा सुटल्याने आयशर पलटी झाली आणि त्या आयशर मधील सर्व जिवंत मासे रस्त्याच्या बाजुला जाऊन पडले.या अपघाताची काहींनी संधी साधली मात्र वेळीच पोलीस घटनास्थळी दाखल होत मदतकार्य सुरु केले.

व्हिडीओ वृत्तांत व बघण्यासाठी चैनल सबस्क्राईब करा

मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र 3 वर दहीवद गावाजवळील चोपडा फाट्या नजीक मुंबई येथून मध्यप्रदेश राज्यातील इंदौर येथे जिवंत मासे घेऊन जाणाऱ्या आयशरचा अपघात घडला.गतीरोधक न दिसल्यामुळे आयशर पलटी झाला आणि यामुळे आयशर मधील संपूर्ण मासे रस्त्याच्या बाजूला जाऊन पडल्याची माहिती चालक अल्लाउद्दीन रफतान यांनी दिली.पहाटे घडलेल्या घटनेमुळे याबाबत ये जा प्रवाशींनी आयशर चालकाला मदत केली मात्र काहींनी मासे पळविण्यासाठी गर्दी संधी सापडल्याने पहाटे गर्दी जमली होती.घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल होत गर्दी दुर करत मदतकार्य सुर केले.त्या पलटी झालेल्या आयशरला पुन्हा उचलून रस्त्यावर आणत त्यात पाणी भरपूर रस्त्याच्या बाजूला पडलेले मासे आयशर मध्ये भरण्यात आले.

WhatsApp
Follow by Email
error: