बातमी कट्टा:- मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भिषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. एकाच वेळी 7 ते 8 वानहांनी धडक दिली आहे. बिजासण घाटात हा अपघाताचा थरार घडला असून यात अंदाजे तीन ते चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली तर इतर जण गंभीर जखमी झाले आहेत.या अपघातात चारचाकी वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला आहे.
शिरपूर तालुक्यातील पळासनेर परिसरात मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्गावर बिजासण घाटात भीषण अपघात घडल्याणी माहिती समोर आली आहे. आज दि 27 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास मध्यप्रदेश सेंधवा कडून शिरपूर अडे येत असतांना ओव्हरटेकच्या नादात अपघात घडल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. या अपघातात लगोपाट 7 ते 8 वाहनांनी मागच्या बाजूंने धडक देत अपघात घडला. यात तिन ते चार चार चाकी वाहनांचा तर काही ट्रकांचा समावेश आहे.घटनेत चारचाकींचा वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला आहे.
घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेत मदतकार्य सुरु केले असून रुग्णवाहिका व पोलीस यंत्र देखील दाखल होत मदतकार्य सुरु आहे.मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार अपघातात तीन ते चार जणांचा जागीच मृत्यू तर ईतर जण गंभीर जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.