मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर “ब्रेक फेल” चालकाचा मृत्यू,दोन गंभीर…

बातमी कट्टा:- मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील बिजासन घाटाच्या उतारावर पळासनेर शिवारात कापसाच्या गाठी वाहून नेणारा अशोक लेलँड कंपनीचा मालट्रक शुक्रवारी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास ब्रेक फेल झाल्याने अनियंत्रित झाल्याने अपघात झाला असून अपघातात चालक मयत झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार मध्यप्रदेशातील सेंधवा येथून कापसाच्या गाठी भरून तामिळनाडू येथे जात असलेल्या अशोक लेलँड कंपनीचे मालट्रक क्रं.टिएन 54 के 5786 क्रमांकाचे मध्यप्रदेश महाराष्ट्र सीमेवरील बिजासन घाट उतारावर शिरपूर तालुक्यातील पळासनेर शिवारातील अंबापाणी फाट्यावर रात्री 10.30 वाजेच्या सुमारास ब्रेक फेल झाल्याने अनियंत्रित झाला आणि रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याने अपघात झाला.

या अपघातात ट्रक चालक महेंद्र मुर्गेश वेलायन वय 22,व्यंकटेश अर्जुन गोविद ·23 मानीवन्नर राधा मोठूकन्न 25 रा काठूवल्लू ता. कांडीयामवती जि. सेलम तामिळनाडू हे गंभीर जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच पोलिस व महामार्ग मृत्युंजयचे कार्यकर्ते तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्य करून मयत व जखमींना महामार्ग रुग्णवाहिकेने शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपजिल्हा रुग्णालयातील डॉ कदम यांनी तपासणी करून महेंद्र मुर्गेश वेलायन 22 यास मयत घोषित केले तर सहचालक व्यंकटेश अर्जुनन गोविंद व मानीवन्नर राधा मोठूकन्न हे गंभीर जखमी त्यांना अधिक उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले आहे. याप्रकरणी वार्डबॉय गणेश बॅंडवाल यांनी तालुका पोलिसात खबर दिल्याने अकस्मात मृत्यू व वाहन अपघाताची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास तालुका पोलीस करीत आहेत.

WhatsApp
Follow by Email
error: