
बातमी कट्टा:- पोटच्या मुलानेच आईला बेदम मारहाण करुन आईची हत्या केल्याची घटना दि २४ रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे.जेवणासाठी बनवलेली माशांची भाजी कुत्र्यांनी खाल्याच्या क्षूल्लक कारणावरून आईची मुलाने हत्या केल्याची घटना घडली आहे.घटनेनंतर संशयीताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरपूर तालुक्यातील ताजपूरी शिवारात देवेंद्र भलेसिंग राजपूत यांच्या शेतात रखवालदारीसाठी काम करणार कुटूंब राहतात.तेथे राहणारा अवलेश रेबला पावरा याने त्याच्या आई टापीबाई रेबला पावरा वय ६७ यांना माशांची भाजी करण्यासाठी सांगितले होते.टापीबाई यांनी भाजी बनवून ठेवली होती.मात्र शेतातील कुत्र्याने भाजी खाल्ली.त्याचा राग आल्याने अवलेश रेबला पावरा याने आपल्या वृध्द आईला लाकडी दांडक्याने मारहाण करत टापीबाई रेबला पावरा यांचा खून केला.

घटनेची माहिती दि २५ रोजी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी समजली.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता संशयित अवलेश पावरा हा फरार झाला होता.थाळनेर पोलिसांनी ४ किमी बनवून अवलेश पावरा याचा शोध सुरु केला असता.आढे शिवारातील केळीच्या शेतात आवलेश पावरा हा मिळून आला. संशयित अवलेश पावरा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
संशयित अवलेश पावरा याला शोधण्याच्या कारवाईत पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे,अप्पर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल गोसावी,यांच्या मार्गदर्शनाखाली थाळनेर सा.पोलिस निरीक्षक शत्रृघ्न पाटील,समाधान भाटेवाल,संजय धनगर,भुषण रामोळे,उमाकांत वाघ,किरण सोनवणे,योगेश पारधी, रामकृष्ण बोरसे,रणजीत देशमुख,मुकेश पवार,दिलीप मोरे,आकाश साळुंखे, होमगार्ड मनोज कोळी,राजू पावरा आदींनी कारवाई केली आहे.
