रात्रीच्या सुमारास लागली घराला आग

बातमी कट्टा:- घराच्या छतावर झोपलेले असतांना शॉर्टशर्कीट मुळे लागलेल्या आगीत घरातील साहित्य जळून खाक झाल्याची झाल्याची घटना रात्री 2 वाजेच्या सुमारास घडली. अग्निशमन बंबाच्या मदतीने आग विझविण्यात आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील बाळदे गावातील दिपक साहेबराव पाटील हे नेहमी प्रमाणे रात्री कुटूंबासह घराच्या छतावर झोपण्यासाठी गेले होते. यावेळी रात्री दोन वाजेच्या सुमारास घरातील स्वयंपाक खोलीत शॉर्टशर्कीटमुळे आग लागली.क्षणातच आगीने भडका घेतला त्यात प्रथमता फ्रिज जळून खाक झाले तर त्यावर असलेले आर.ओ.फिल्टर मशीनला आग लागली.या आगीत घरातील दोन खोलींमधील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.नागरिकांनी आग विझविण्यासाठी मदत कार्य सुरु केले होते.तर घटनास्थळी शिरपूर येथून अग्निशमन बंब दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.मात्र त्या वेळेत दोन खोलींमधील संसारोपयोगी साहित्यांसह फ्रिज,वॉटर फिल्टर,टिव्ही सह ईतर दिड ते दोन लाखांचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: