राष्ट्रगौरव महाराणा प्रतापसिंहजी यांच्या जयंतीनिमित्त नितीन बानुगडे-पाटील यांचे धुळ्यात व्याख्यान, दि 1 रोजी सायंकाळी होणार व्याख्यान…

बातमी कट्टा:- विर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी तथा हिंदु कुलभूषण सम्राट पृथ्वीराज चव्हाण यांच्या जयंती निमित्ताने विर महाराणा प्रतापसिंहजी यांच्या शौर्यगाथा’ या विषयावर धुळे येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. देशाला परिचित असलेले प्रख्यात वक्ते, लेखक, इतिहास अभ्यासक नितीन बानुगडे-पाटील हे या व्याख्यानाचे पुष्प गुंफणार आहेत.

दि. 2 जून रोजी महाराणा प्रतापसिंहजी यांची जयंती आहे. यानिमित्ताने वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी स्मारक समिती आणि जयंती उत्सव समिती यांच्यासह समस्त राजपूत समाजाच्या वतीने धुळे येथे दोन दिवसीय विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 1 जून, बुधवार रोजी, सायंकाळी 6 वाजता वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी यांच्या शौर्यगाथा या विषयावर इतिहास अभ्यासक, प्रेरणादायी वक्ते नितीन बानुगडे-पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक सरकारसाहेब रावल राहणार आहेत.तर आमदार जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न होणार आहे. या व्याख्यानाच्या निमित्ताने कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खासदार तथा माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटीलधुळे ग्रामीण मतदार संघाचे आमदार कुणाल बाबा पाटील,भाजप महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल, नगरसेवक तथा माजी महापौर प्रदीप करपे, माजी महापौर नगरसेवक चंद्रकांत सोनार हे उपस्थित राहणार आहेत. या व्याख्यानाला संपूर्ण धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित राहून, वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या शौर्य गाथाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी स्मारक समिती धुळे आणि जयंती उत्सव समितीकडून करण्यात आले आहे. या व्याख्यानासाठी महिलांना बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. धुळे येथील महाराणा प्रतापसिंहजी स्मारक चौक या ठिकाणी हे व्याख्यान संपन्न होणार आहे.

तर दि 2 जून, गुरूवारी रोजी पहाटे 3:50 मिनिटांनी ब्रह्म मुहूर्तावर वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अभिषेक केला जाणार आहे. सकाळी 9 वाजता स्मारक पूजन व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम जिल्हा सरकारी वकील अॅड देवेंद्रजी तंवर यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. तर 2 जून रोजी सायंकाळी 7 वाजता संगीत उत्सवाचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे. दि. 2 जून रोजी संपन्न होणाऱ्या पूर्णाकृती पुतळा अभिषेक, स्मारक पूजन, रक्तदान शिबीर आणि संगीत उत्सवाला तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्मारक तथा जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

दि. 1 व 2 जून रोजी संपन्न होणारे सर्व कार्यक्रम हे वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी स्मारक चौक, धुळे येथे संपन्न होणार आहेत. या दोन दिवसीय व्याख्यान आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांची जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डाॅ. दरबारसिंह गिरासे, स्मारक समितीचे अध्यक्ष अजितसिंह राजपूत, निलेश जाधव, सौ विजया ताई जितेंद्र गिरासे, तेजपाल गिरासे, मंजीत सिसोदिया,Ad.शैलेश राजपुत, जगदीश राणा,विजयसिंह सिसोदिया,पुष्कर राठोड,अभिजित परदेशी जसपाल सिसोदिया,गणेश कोर,महेंद्र सिसोदिया, नानासाहेब महाले,संगीता ताई राजपुत, दादा कोर, बापुसिंग राठोड, नानासाहेब महाले आणि सर्व सन्माननीय समिती पदाधिकारी मार्फत सुरू आहे.

WhatsApp
Follow by Email
error: