राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे साक्री मेळावा दरम्यान प्रतिक्रिया…

बातमी कट्टा:- सरकार स्थिर असून पाच वर्ष कार्यकाळ पुर्ण करेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.धुळे जिल्ह्यातील साक्री येथे ठेलारी समाजाच्या मेळाव्यासाठी आले असतांना बोलत होते.

बघा व्हिडीओ

आज धुळे जिल्ह्यातील साक्री येथे ठेलारी समाजाच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सामाजिक न्याय मंत्री धनजय मुंडे उपस्थित होते.यावेळी महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करेल असं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले त्यांनी सरकार बदलाच्या किंवा मध्यावधी निवडणुकांच्या सर्व शक्यता फेटाळून लावत सरकार स्थिर असून पाच वर्षे कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त केला.

ठेलारी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रयत्न केले जात असून,त्याचाच एक भाग हा मेळावा असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.यासाठीच ठेलारी समाजाचे प्रश्न जाणून घेण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि मी देखील उपस्थित असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

on youtube
WhatsApp
Follow by Email
error: