रुदावली येथे राष्ट्रीय पोषण पखवाडा अभियान संपन्न

बातमी कट्टा:- आज दिनांक 21 मार्च 2022 रोजी शिरपूर तालुक्यातील वनावल गटातील रुदावली या ठिकाणी पोषण पखवाडा कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वनावल गटाचे जि. प. प्र. भरत भिलाजी पाटील तसेच रुदावली गावाचे सरपंच संजय सोनवणे, उपसरपंच पितांबर पाटील,ग्रामसेवक ऋषिकेश बोरसे, ग्रा. सदस्य उषाबाई कुवर, ग्रामपंचायत सदस्य विमलबाई सोनवणे, जि. प. मराठी शाळा मुख्याध्यापक सुनील वाघ सर,किशोर महाले सर,धर्मेंद्र पाटील सर,आरोग्य सेवक CHO सौ.जाधव मॅडम, APW मंगलसिंग वळवी, ANM सौ.रंजना परदेशी,भाग वाडी- 2 रुदावली येथील अंगणवाडी क्रमांक- 1शिक्षिका सौ. अरस्तोल प्रवीण मोरे अंगणवाडी क्रमांक- 2 शिक्षिका सौ.रेखाबाई भरत भिल उपस्थित होते.


कार्यक्रमात बालकांची प्रत्यक्ष वजन, उंची घेऊन पालकांना सामाजिक लेखापरीक्षण करून साधारण, मध्यम व तीव्र श्रेणी दाखवण्यात आली व पोषण आरोग्य बाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच तरंग सुपोशित महाराष्ट्राच्या नंबर देऊन IVR व्हाट्सअप चॅट करून जनजागृती करण्यात आली. त्याचप्रमाणे पालकांना सुदृढ बालकाचे महत्त्व सांगून सकस व पोषण आहाराचे महत्व पालकांना पटवून देण्यात आले. बाळ सहा महिने पूर्ण झाल्यावर बाळाला पोषण आहार सुरू करून अन्नातील पोषक घटकांचे महत्त्व सांगण्यात आले. तसेच लसीकरणाचे महत्त्व देखील सांगण्यात आले. पोषण पखवाडा या कार्यक्रमाद्वारे पालकांमध्ये पोषणा विषयी जनजागृती करण्यात आली.

WhatsApp
Follow by Email
error: