बातमी कट्टा:- रोज विनाक्रमांकाच्या वेगवेगळ्या मोटारसायकली फिरवत असल्याने त्यांच्यावर संशय होता.एक मोटारसायकल चोरीची फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी विना क्रमांक मोटारसायकल फिरवणाऱ्या त्या दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडील 1 लाख 15 हजार किंमतीच्या 5 चोरीच्या मोटारसायकल हस्तगत करण्यात आले आहेत.

धुळे शहरात दि 5 रोजी मालेगांव येथील मंजुरअली वाजीदअली सैय्यद वय 32 हे धुळे येथील शराफत अली सैय्यद यांच्या धुळ्यातील मुन्शी मश्जीद जवळील घरी घरगुती कामासाठी गेले होते. रात्री त्यांनी त्यांची मोटरसायकल घरासमोर लावली असता त्या मोटरसायकलची चोरी झाली याबाबत मंजुरअली यांनी धुळे चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता.
येथील पोलीस स्टेशनचे सा.पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांना गोपणीय माहिती प्राप्त झाली होती की,अरशद मन्यार व रिजवान अन्सारी हे दोन संशयित रोज वेगवेगळ्या विनाक्रमांकाच्या मोटरसायकली फिरवतात.यावरुन सा. पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांनी दोघांना ही ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता त्यांनी मोटारसायकलची कबुली दिली त्यांच्या ताब्यात असलेल्या 1 लाख 15 हजार किंमतीचे 5 चोरीच्या मोटरसायकली पोलिसांकडे दिल्या आहेत यातील एक मोटरसायक फिर्यादी मंजुरअली सैय्यद यांची आहे.
मा.न्यायालयात दोघाही संशयितांना उभे केले असता दि 16 रोजी पर्यंत त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सदर कारवाई सपोनी संदिप पाटील,पोसई व्हि.व्हि.चौरे,अजिज शेख,के.एन.वाघ,बी.आय.पाटील,एम.आर.शाह,हेमंत पवार,स्वप्नील सोनवणे,चेतन झोळेकर, पी.ए.पाटील, एम.जे.पावरा आदींनी कारवाई केली आहे.