बातमी कट्टा:- गुरांवर आलेल्या लम्पि आजाराने सर्वत्र थैमान घातले आहे. गुरांवर होणाऱ्या या भिषण आजारामुळे शेतकऱ्यांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.लम्पि स्किन डिसीज आजारापासून गुरांच्या सुरक्षतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिरीष पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिंगावे शिवारात पाचशे पेक्षा जास्त गुरांना मोफत लम्पि रोगाची लस व गोचीड यावर फवारणी शिबीर राबविण्यात आले.यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
आज दि 17 रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिरीष पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोफत लम्पि रोगाची लस व गोचीड यावर फवारणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीरात पाचशे पेक्षा जास्त गुरांना लस व फवारणी देण्यात आले.यासाठी शिरपूरचे पशुवैद्यकीय अधिकारी व त्यांच्या संपूर्ण टीमचे सहकार्य लाभले तसेच शिंगावे गावातील ज्येष्ठ नागरिक व तरुण मित्रमंडळी सहकार्य केले. यावेळी सरपंच गुलाबराव पाटील, चेअरमन संजय पाटील ,ज्येष्ठ नागरिक रमेश आबा, संभाजी गुरुजी ,वसंत नाना ,सतीश आबा, दीवान आबा, शिवा अण्णा, सुरेश बापू, बाळू नाना ,गुलाब बापू ,संजय पाटील, प्रवीण भाऊसाहेब, पोपट भाऊसाहेब , संजू काका ,जयवंत तात्या, भरत भाऊसाहेब , सतीश आबा, कैलास आप्पा, यशवंत भाऊसाहेब, बाळासाहेब देशमुख, युवराज तात्या, बाळू नाना, लीलाचंद मास्तर ,श्रीधर नाना, धीरज पाटील ,संभाजी पाटील, सुनील पाटील ,भगवान नाना , सुभाष काका तसेच इतर सर्व ग्रामस्थांनी या शिबिरासाठी मोलाचं सहकार्य केले.या शिबिराचे आयोजन केल्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.