लेट फी च्या नावाने ग्रामसेवकाने घेतली लाच,लाचखोर ग्रामसेवक धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात

बातमी कट्टा:- ग्रामपंचायतीत जन्माची नोंद करण्यासाठी लेट फीच्या नावाने १४०० रूपयांची मागणी करणाऱ्या ग्रामसेवकाला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून १४०० रुपयांची लाच स्विकारतांना रंगेहाथ ताब्यात घेतले असून त्याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यादरम्यान ताब्यात घेते वेळी ग्रामसेवकाने प्रतिकार केल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बळाचा योग्य वापर करून लाच स्विकारतांना ग्रामसेवकाला ताब्यात घेतले आहे.

तक्रारदार हे जामन्यापाडा ता. शिरपुर येथील रहीवाशी असुन त्यांच्या आत्याचा जन्म दि. ०१.०५.१९६८ रोजी मौजे जामन्यापाडा, ता. शिरपुर येथे झाला असुन त्यांचे आजोबा अशिक्षित असल्याने त्यांच्या जन्माची नोंद केली गेली नव्हती. तक्रारदार यांच्या आत्याची जन्माची नोंद होणे करीता तक्रारदार यांची आत्याने शिरपुर येथील मे. ज्युडीशिअल मॅजि वर्ग०१ यांच्या न्यायालयात जन्माची नोंद होणे करीता फौजदारी किरकोळ अर्ज नं ४७२/ २०२२ दाखल केला होता. सदर अर्जावर सुनावणी होवुन मा.न्यायालयाने तक्रारदार यांच्या आत्याची जन्माची दप्तरी नोंद घेणे बाबत दि.१४.१०.२०२२ रोजी आदेश पारित केले आहेत. त्याप्रमाणे तकारदार यांनी आत्याच्या जन्माची दप्तरी नोंद होणे करीता दि.१६.०५.२०२३ रोजी ग्रामपंचायत कार्यालय, जामन्यापाडा येथे जावुन मा.न्यायलयाच्या आदेशाची प्रत जोडुन अर्ज ग्रामसेवक गुलाब रामदास चौधरी यांच्याकडे जमा केला होता. त्यावेळी त्यांनी तक्रारदार यांना त्यांच्या आत्याच्या जन्माची नोंद घेवुन जन्म दाखला देण्यासाठी तकारदार यांच्याकडे १४००/- रूपये लेट फीच्या नावाखाली लाचेची मागणी केल्याची दुरध्वनी द्वारे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे कार्यालयास माहिती दिली होती त्यावरून धुळे लाचलुचपत प्रतिबंधकाचे पथकाने आज दि.०५.०६.२०२३ रोजी जामन्यापाडा, ता. शिरपुर येथे जावुन तकारदार यांची तक्रार नोंदवुन घेतली होती.

सदर तकारीच्या अनुषंगाने आज दि.०५/०६/२०२३ रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान ग्रामसेवक गुलाब रामदास चौधरी यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या आत्याची जन्मांची नोंद घेण्यासाठी लेट फीच्या नावाखाली पंचसाक्षीदारा समक्ष १४००/- रु. लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम ग्रामपंचायत कार्यालय, जामन्या पाडा, ता. शिरपुर जि. धुळे येथे स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्या दरम्यान ग्रामसेवक चौधरी यांना ताब्यात घेते वेळी त्यांनी प्रतिकार केल्याने त्यांना सापळा पथकाने योग्य बळाचा वापर करुन त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांचे विरूध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. प्रकाश झोडगे, मंजितसिंग चव्हाण,तसेच राजन कदम, शरद काटके, भुषण खलाणेकर, भुषण शेटे, संतोष पावरा,रामदास बारेला,गायत्री पाटील, मकरंद पाटील, प्रविण पाटील, प्रशांत बागुल, रोहीणी पवार, वनश्री बोरसे, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर यांनी केली आहे.सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर व वाचक पोलीस उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शन लाभले असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.

WhatsApp
Follow by Email
error: