लोंबकळणाऱ्या तारांच्या शॉर्टशर्कीटीमुळे चालत्या ट्रॅक्टर मधील कडब्याला आग

बातमी कट्टा:- रस्त्यावर लोंबकळणाऱ्या तारांच्या शॉर्टशर्कीट झाल्याने चालत्या ट्रॅक्टर मधील दादर कडबाला आग लागल्याने संपूर्ण कडबा जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.गावकऱ्यांच्या मदतीने आग विझविण्यात आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार अमळनेर तालुक्यातील करंखेडा येथून सबगव्हाण येथे ट्रॅक्टरमध्ये दादरचा कडबा घेऊन जात असतांना भोरटेक गावाबाहेरील चौपाटी लगत असलेल्या रस्त्यावर लोंबकळणाऱ्या तारांमध्ये शॉर्टशर्कीट झाल्याने रस्त्याने जाणाऱ्या ट्रॅक्टर मधील कडब्याला आग लागली.गावातील नागरिकांना माहिती मिळताच नागरिकांनी धावपळ करत आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यावेळेत ट्रॅक्टर वरील संपूर्ण कडबा जळून खाक झाला. महावितरण विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे रहदारीच्या रस्त्यावर तारा लोंबकळत आहेत.या तारांमुळे भविष्यात यापेक्षाही मोठी दुर्घटना घडु शकते यामुळे महावितरण विभागाने तात्काळ या तारांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

WhatsApp
Follow by Email
error: