लोकनियुक्त “सरपंच”यांच्या विरूद्ध अविश्वास ठराव मंजूर….

बातमी कट्टा:- लोकनियुक्त सरपंच यांच्या विरूध्द ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव मांडला होता. आज तहसीलदार यांच्या उपस्थितीत सरपंचावरील अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे.यावेळी पोलीस यंत्रणा देखील उपस्थित होती.

शिरपूर तालुक्यातील वनावल येथील लोकनियुक्त सरपंच सौ.भावना मनोहर पाटील यांच्याविरुध्द अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे.वनावल ग्रामपंचायतीत 9 सदस्य वगळता लोकनियुक्त सरपंच म्हणून भावना पाटील हे 13/3/2019 रोजी विराजमान झाले होते.आज दि 16 रोजी तहसीलदार आबा महाजन मंडळाधिकारी संदीप जगताप,तलाठी रेणुका राजपूत,ग्रामवसेवक यांच्या समक्ष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी वनावल ग्रामपंचायतीच्या 9 सदस्यांपैकी 8 सदस्य हे अविश्वास ठरावासाठी तहसीलदार आबा महाजन यांच्या समोर उपस्थित राहुन सरपंच भावना पाटील यांच्या विरुध्द अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला.

वनावल येथे एका सदस्याची बिनविरोध निवड करण्यात आली होती.तर 8 सदस्यांसाठी दोन पँनलांमध्ये लढत लागली होती.मनोहर देवरे यांच्या विरुध्द प्रतापसिंग राऊळ यांच्या पँनलचे 8 सदस्य लढत होते.यात पँनल प्रमुख प्रतापसिंग राऊळ यांना मार्केट कमिटीचे माजी संचालक मोहन पाटील,माजी पंचायत समिती सदस्य भरत भिलाजी पाटील,वकील छोटु गिरासे यांनी पाठींबा दिल्याने चांगली रंगत रगंली होती. यात प्रतापसिंग राऊळ यांचे 8 सदस्य निवडून आले होते. त्यानंतर लोकनियुक्त सरपंच पद असल्याने त्यावेळी लोकनियुक्त सरपंच म्हणून मनोहर देवरे यांच्या पत्नी भावना पाटील या सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या.

8 सदस्यांनी अविश्वास ठरावासाठी सांगितलेले कारणे

सरपंच सौ.भावना मनोहर पाटील या सदस्यांना विकासाचे कामासाठी विश्वासात घेत नाही.मनमानी कारभार करीत आहेत.सरपंच या ग्रामपंचायतीचे काम न करता न पाहता त्यांचे पती मनोहर पाटील हेच सर्व काम करतात त्यांच्यावर मागील पंचवार्षिक मध्ये भ्रष्टाचाराची चौकशी सुरु आहे.

या 8 सदस्यांनी केला सरपंच विरुध्द अविश्वास ठराव

उपसरपंच पुनम पौलद भिल, पशुराम विश्राम धनगर,कालु बक्सु गिरासे,सौ.जिजाबाई येसू भिल,सौ.मरीनाबाई ज्ञानेश्वर कोळी,आशाबाई अमन गिरासे, विजयाबाई राजेंद्र धनगर,चैताली क्रांती पाटील या आठ सदस्यांनी कारणे देत सरपंचांवर अविश्वास ठराव मांडला आहे.

सरपंच भावना पाटील काय म्हटले

यावेळी सरपंच यांना आपले म्हणे मांडण्यासाठी वेळ देण्यात आला होता तेव्हा सरपंच यांनी सांगितले की,सर्व सदस्यांना बोलावून त्यांच्या सहमतीने कामे केली जातात. तसेच भ्रष्टाचाराचे आरोप पतीवर असून ते सर्व चुकीचे आहेत ते मान्य नाहीत.व सरपंच म्हणून माझ्याशी संबधीत नाहीत.सदस्यांनी माझ्यावर केलेले आरोप मान्य नाहीत. तसेच जनतेने सरपंच म्हणून निवडून दिले आहे सदस्यांनी नाही.असे यावेळी बैठकीत सरपंच भावना पाटील यांनी सांगितले.

WhatsApp
Follow by Email
error: