लोकवर्गणीतून उभारले भव्य महादेव मंदिर

बातमी कट्टा:- शिंदखेडा तालुक्यातील वरुळ घुसरे येथे ग्रामस्थांतर्फे श्री अर्थ शिवशंकर महारुद्र देवदत्त प्राणप्रतिष्ठा तीन दिवशीय सोहळा आयोजित करण्यात आला होता. दि. २७ ते २९ फेब्रुवारी या तीन दिवशीय महादेव मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला होता.

गावात पूर्वी पुरातन असे महादेव मंदिर होते मात्र आपल्या गावात भव्य व दिव्य असे महादेवाचे मंदिर व्हावे अशी ग्रामस्थांची इच्छा होती यासाठी गावकरी महिलावर्ग भजनी मंडळ तरुण वर्ग यांनीआपल्या यथाशक्ती प्रमाणे लोकवर्गणी करून गावाबाहेर भव्य व दिव्य असे पुरातन महादेव मंदिर साकारले.यामुळे गावकऱ्यांचे स्वप्न पूर्ण झाल्याने तीन दिवसीय धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पहिल्या दिवशी फुलांनी सजवलेल्या बैलगाडीवर पुरातन महादेव शिवलिंग व नंदी तसेच गणपती यांची गावातून भजनी मंडळाच्या सहकार्याने भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावकरी महिला भजनी मंडळ तरुण मंडळ स्वयंपूर्णभाग घेऊन उत्साहात सहभाग नोंदवला दुसऱ्या दिवशी गावातील १८ जुल्फी यांचे हस्ते विधिवेत ओम यज्ञ व पूजा करण्यात आली तिसऱ्या दिवशी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी शिरपूर येथील पुरोहित वेधशास्त्री श्रीपाद जोशी व हिंदू धर्मप्रचारक योगी आज योगी दत्तनाथ महाराज पिलखोड यांच्या प्रमुख उपस्थित तीन दिवशी कार्यक्रम भक्ती भवानी उत्सा- हात संपन्न झाला यावेळी ग्रामस्थांतर्फे महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

WhatsApp
Follow by Email
error: