
बातमी कट्टा:- मूलभूत सुविधांपासून वंचित राहिलेल्या वडाळी गटात आता एक सक्षम नेतृत्व उभे राहिले आहे. वडाळी परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा, गावागावांत बदल घडावा आणि या परिसराचा कायापालट व्हावा, या ध्येयाने प्रेरित तरुण नेतृत्व म्हणजे “रवींद्रसिंह गिरासे ऊर्फ रवी शेट” आज प्रत्येकाच्या मनात नावारूपाला येत आहेत.
देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष झाली, पण वडाळी गटातील गावांचा विकास मात्र अद्याप खुंटलेला दिसतो. आरोग्य, शिक्षण, रस्ते आणि शुद्ध पाणी यांसाठीची धडपड आजही या भागातील नागरिक करत आहेत. या परिस्थितीकडे पाहून कुणाच्याही मनात अस्वस्थता निर्माण होतेच आणि हाच अस्वस्थतेचा ठिणगा रवींद्रसिंह गिरासे यांच्या मनात परिवर्तनाच्या ज्योतीत रूपांतरित झाला आहे.
देऊर या गावात जन्मलेला हा तरुण, कमी वयातच हलाखीच्या परिस्थितीवर मात करत संघर्षाच्या वाटेवर निघाला. सुरतसारख्या शहरात अनेक संकटांचा सामना करत, आज एक यशस्वी उद्योजक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे. मात्र, आपल्या मूळ गावातील आणि परिसरातील खुंटलेल्या विकासाचे चित्र पाहून त्यांच्या मनात नेहमीच वेदना उमटतात.
हीच वेदना आता वडाळी गटाच्या विकासाची प्रेरणा ठरत आहे. समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र घेऊन, गावागावात विकासाचे नवे अध्याय लिहिण्याचं स्वप्न रवींद्रसिंग गिरासे पाहत आहेत.वडाळी गटात एक हक्काचं, आणि कर्तृत्ववान नेतृत्व आकार घेत आहे आणि त्या नेतृत्वाचं नाव आहे रवींद्रसिंग गिरासे रवीशेट !
